आलिया भट्ट कशी Fat to Fit झाली, जाणून घ्या तिचा वर्कआउट रुटीन
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अनेकदा तिच्या युट्यूब चॅनल व इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसमवेत फिटनेस, ब्युटी टिप्स शेअर करत असते. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी, आलिया दररोज व्यायामाहस स्ट्रिक्ट डाएट प्लॅन फोलो करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका व्हिडिओमध्ये आलियाने सांगितले की सकाळी उठल्यानंतर लगेचच फोनला हात लावत नाही आणि सोशल मीडियापासूनही दूर राहते. स्वत: ला अपडेट ठेवण्यासाठी तिला सकाळी वर्तमानपत्र वाचायला आवडते.
आलियाला रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय आहे. आलियाने आपल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये सांगितले होते की आधी तिला कॉफी पिण्याची सवय आहे होती. मात्र, फिटनेसच्या दृष्टीने कॅफिनचे प्रमाण कमी केले आहे. दिवसभर तंदुरुस्त आणि एनर्जेटिक राहण्यासाठी आलिया भट्ट दररोज चालायला जाते.
आलिया भट्ट कडक फिटनेस वेळापत्रक पाळते. ज्यात कार्डिओ, वजन प्रशिक्षण, नृत्य आणि योग व्यायामाचे मिश्रण आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या वर्कआउट रुटीनमध्ये प्रामुख्याने वेट ट्रेनिंग, बीच रनिंग, पोहणे, किकबॉक्सिंग आणि फंक्शनल ट्रेनिंगचा समावेश आहे.
आलिया भट्ट लाही योगा करायला आवडते. योगामुळे तिचे शरीर लवचिक असल्याचे तिचे म्हणणे आहे.
आलियाच्या आवडत्या योग आसनांमध्ये हेडस्टँड, चक्रासन, भुजंगासन, सूर्य नमस्कार, प्राणायाम आणि ध्यान यांचा समावेश आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे की आलिया भट्ट चित्रपटांत येण्यापूर्वी खूप गुबरी दिसायची. आलियाने स्वत:ला शेप देण्यासाठी आपल्या आहारात विशेष लक्ष दिले.
मीडिया रिपोर्टनुसार ती साखर, कार्ब्स, तेलकट आणि जंक फूडपासून स्वत: ला दूर ठेवते. आलिया दिवसभर भरपूर पाणी पिते.
आपल्या सर्वांना माहित आहे की आलिया भट्ट चित्रपटांत येण्यापूर्वी खूप गुबरी दिसायची. आलियाने स्वत:ला शेप देण्यासाठी आपल्या आहारात विशेष लक्ष दिले.