PHOTO : अभिनयात नाहीतर, 'या' क्षेत्रात करायचंय शाहरुख खानच्या मुलाला काम
Aryan_khan
1/10
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान म्हणजे, कोट्यवधी तरुणींच्या गळ्यातील ताईत. शाहरुखचे चाहते केवळ देशातच नाहीत, तर संपूर्ण जगभरात आहेत. शाहरुखने आपल्या करिअरमध्ये अनेक भूमिका रुपेरी पडद्यावर साकारल्या. शाहरुखच्या भूमिका आणि त्याच्या अभिनयानं त्याने चाहत्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. अशातच आता शाहरुखनंतर त्याचा मोठा मुलगा आर्यनच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. (Photo Credit : @___aryan___/Instagram)
2/10
शाहरुखप्रमाणेच आर्यन खानही स्टायलिश आहे. इन्स्टाग्रामवर आर्यन खानचे अनेक फॉलोअर्स आहेत. परंतु, आर्यन खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शाहरुखनेही आपल्या मुलाच्या पदार्पणाबाबत कोणतंही वक्तव्य केलंलं नाही. (Photo Credit : @___aryan___/Instagram)
3/10
शाहरुख खानला एका मुलाखतीत आर्यनच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी शाहरुख म्हणाला की, आर्यनला अभिनेता नाही, तर दिग्दर्शक व्हायचंय. (Photo Credit : @___aryan___/Instagram)
4/10
आर्यनचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून आर्यनच्या या फोटोंवरुन शाहरुखचं म्हणणं खरं असल्याचं कळतंय. आर्यनने बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स, सिनेमेटिक आर्ट्स, फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन प्रोडक्शनमध्ये पदवी मिळवली आहे. (Photo Credit : @___aryan___/Instagram)
5/10
आर्यन सध्या अमेरिकेत आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. (Photo Credit : @___aryan___/Instagram)
6/10
शाहरुख खानने सांगितल की, त्याची मुलगी सुहाना खानला अभिनयाची आवड असून तिला अभिनेत्री व्हायचंय. (Photo Credit : @___aryan___/Instagram)
7/10
सध्या सुहानाही अमेरिकेत आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. (Photo Credit : @___aryan___/Instagram)
8/10
(Photo Credit : @___aryan___/Instagram)
9/10
(Photo Credit : @___aryan___/Instagram)
10/10
(Photo Credit : @___aryan___/Instagram)
Published at : 19 May 2021 12:34 PM (IST)