ब्लॅक वॉरन्ट ते मटका किंग, आगामी वर्षात भन्नाट वेब सिरिज होणा रिलीज, मनोरंजनाचा खजिना खुला होणार!
2025 हे साल मनोरंजन विश्वात मोठ्या घडामोडी घडवूण आणणार आहे. कारण आगामी वर्षात सहा मोठ्या वेब सिरिज येणार आहेत. 17 जानेवारी 2025 रोजी पाताल लोक या वेब सिरिजचा दुसरा भाग येणार आहे. नुकतेच त्याची घोषणा करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या अनेक दिवसांपासून मटका किंग या वेब सिरिजची चर्चा आहे. या वेब सिरिजमध्ये विजय वर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारलेली आहे. याच वेब सिरिजमध्ये कृतिका कामरा ही अभिनेत्रीदेखील झळकणार आहे. ही वेब सिरिज 2025 साली रिलीज होणार आहे.
ब्लॅक वॉरंट या वेब सिरिजच्या माध्यमातून जहान कपूर ओटीटीवर डेब्यू करणार आहे. तो शशी कपूर यांचा नातू आहे. येत्या 10 जानेवारी रोजी ही वेब सिरिज प्रदर्शित होणार आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने स्टारडम या वेब सिरिजचे दिग्दर्शन केलेले आहे. दिग्दर्शक म्हणून आर्यन खानचा हा पहिलाच प्रयोग असणार आहे. ही वेब सिरिज नेटफ्लिक्सवर रिलिज होणार असून तीदेखील 2025 या सालात येणार आहे.
त्यानंतर द फॅमिल मॅन या वेब सिरिजच्या तिसऱ्या सिझनची लोक आतुरतेने वाट पहात आहेत. या वेबसिरिजमध्ये मनोज वाजपेयी यांची प्रमुख भूमिका आहे. या वेब सिरिजचा तिसरा सिझन अॅमोझॉन प्राईमवर आगामी वर्षातच रिलिज होणार आहे.