'या' दिग्गज कंपनीने घेतला स्टॉक स्प्लिटचा निर्णय, एका शेअरचे होणार 5 तुकडे, शेअर होल्डर्सना फायदा होणार का?
Stock Split: FMCG सेक्टरमधीलसीफूड सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या Coastal Corporation या कंपनीने सोमवारी (23 डिसेंबर) मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आपल्या समभाग को शेयरधारकों के लिए एक महत्वपूर्ण घोषणा की है. कंपनीने समभागांना स्प्लिट (स्टॉक स्प्लिट) करण्याचा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टॉक स्प्लिटच्या या निर्णयानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये 7 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली.
या कंपनीने सेबीकडे स्टॉक स्प्लिटसाठी अर्ज केलेला आहे. या अर्जानुसार स्टॉक स्प्लिटच्या अगोदर या कंपनीच्या एका शेअरची फेस व्हॅल्यू (दर्शनी किंमत) 10 रुपये होती. स्टॉक स्प्लिटच्या निर्णयानंतर एका शेअरची फेस व्हॅल्यू 2 रुपये करण्यात येईल.
म्हणजेच तुमच्याकडे अगोदर अगोदर 10 रुपयांचा एक शेअर असेल तर स्टॉक स्प्लिटनंतर तुमच्याकडे 2 रुपये फेस व्हॅल्यू असलेले एकूण 5 शेअर्स अशतील.
म्हणजेच तुमच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल होणार नाही. फक्त शेअरच्या फेस व्हॅल्यूमध्ये बदल होईल. म्हणजेच भागधारकांची मालकी, हिस्सेदारी यामध्ये कोणताही बदल होणार नाही.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)