Photo : अभिनयाची अनभिषिक्त सम्राज्ञी स्मिता पाटील यांच्या आयुष्याचा मागोवा
अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा आज जन्मदिवस आहे. आपल्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अप्रतिम कलाकृती दिल्या आहेत. हिंदी सिनेमांसाठीच्या योगदानामुळे आजही त्यांना एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती. (photo: @Filmfare/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला होता. आपल्या सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली स्मिता पाटील गंभीर भूमिकांमध्ये जास्त रमली. (photo: @Filmfare/FB)
तिच्या सशक्त अभिनयाची छाप उंबरठा, भूमिका, जैत रे जैत, निशांत, मंथन आदी चित्रपटांनी प्रेक्षकांवर पाडली आहे. (photo: @Filmfare/FB)
पण गंभीर अभिनयासाठी ओळखली जाणारी स्मिता खऱ्याखुऱ्या आयुष्यात खोडकर होती. (photo: @Filmfare/FB)
मुंबई दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून स्मिता पाटील यांचं करिअर सुरु झालं. अभिनेता राज बब्बरसोबतच्या प्रेमामुळे स्मिता पाटील चर्चेत आल्या. राज बब्बर विवाहित असूनही स्मिता पाटीलशी लग्न करण्यास तयार झाले. यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला. (photo: @Filmfare/FB)
स्मिता पाटील यांच्या करिअरमध्ये भूमिका, मंथन, मिर्च मसाला, अर्थ, मंडी, निशांत तसंच नमक हलाल आणि शक्तीसारख्या सिनेमांचा वाटा मोलाचा आहे. (photo: @Filmfare/FB)
1977 साली भूमिका आणि 1980 मध्ये चक्र या चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसंच 1978च्या जैत रे जैत आणि भूमिका, 1981 साली उंबरठा, 1982 साली चक्र, 1983 मध्ये बाजार, 1985 मध्ये आज की आवाज या सिनेमांसाठी फिल्मफेअरनेही स्मिता पाटील यांना गौरवलं गेलं आहे. मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर 13 डिसेंबर 1986 ला वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. (photo: @Filmfare/FB)