Rahul Dravid : द्रविडच्या मार्गदर्शनात टीम इंडिया पुन्हा नंबर वन होणार?

(Photo:@rahuldravid/FB)

1/9
Team India Coach Update:  भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय संघाच्या पुढच्या प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचं नाव चर्चेत आहे.(Photo:@rahuldravid/FB)
2/9
भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपद आता राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) येणार असल्याची शक्यता आहे..(Photo:@rahuldravid/FB)
3/9
राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं.(Photo:@rahuldravid/FB)
4/9
राहुल द्रविडला मानधन म्हणून 10 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंतच्या इतिहासात प्रशिक्षकांना मिळणारं हे सर्वाधिक मानधन असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.  (Photo:@rahuldravid/FB)
5/9
सूत्रांच्या माहितीनुसार दुबईत झालेल्या आयपीएल फायनल सामन्यादरम्यान बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआचा अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राहुल द्रविडसोबत बैठक केली. या बैठकीत राहुल द्रविडनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, बोर्ड त्याला काय ऑफर देऊ इच्छिते.  (Photo:@rahuldravid/FB)
6/9
काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडनं टीम इंडियाचा कोच होण्यास नकार दिला होता. बीसीसीआयनं त्याला प्रशिक्षक करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. अखेर बीसीसीआयच्या प्रयत्नाला यश मिळत असल्याचं दिसत आहे.  (Photo:@rahuldravid/FB)
7/9
द्रविडनं होकार दिला असला तरी अद्याप बीसीसीआयकडून कुठलीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं.(Photo:@rahuldravid/FB)
8/9
नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक होता. या दौऱ्यात शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया वनडे मालिका जिंकली होती.(Photo:@rahuldravid/FB)
9/9
राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात टीम इंडिया क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात नंबर येईल अशी आशा आहे(Photo:@rahuldravid/FB)
Sponsored Links by Taboola