Shah rukh Khan : शाहरुख त्याच्या सिनेमातील नायिकेची स्वत: निवड करतो? म्हणाला...
बॉलीवुडच्या किंग खानसोबत काम करण्याची प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुम्हाला माहित आहे का शाहरुखच्या सिनेमासाठी नायिकेची निवड कोण करतं?
शाहरुख खान स्वत: त्याच्या चित्रपटांची नायिका निवडतो का, असा प्रश्न अनेकांना कायम पडतो.
दरम्यान मी बॉलिवूडमध्ये आल्यापासून एकाही चित्रपटासाठी स्वत:ची हिरोईन निवडलेली नाही, असं स्वत: शाहरुखने म्हटलं होतं.
शाहरुख खान म्हणाला की, मी नवीन होतो तेव्हा दिव्या भारती, माधुरी, मनीषा कोईराला यांसारख्या अनेक टॉप अभिनेत्रींनी माझ्यासोबत काम केले होते.
या अभिनेत्याने असा खुलासाही केला की, त्या काळात मी माझ्या करिअरमध्ये कधीही कोणाशीही काम करण्यास नकार देणार नाही असे ठरवले होते आणि आजपर्यंत मी कधीही दिग्दर्शकाला नायिकेला घेण्यास सांगितले नाही.
शाहरुख खानच्या म्हणण्यानुसार, अनेकवेळा त्याच्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी त्याच्याशी चित्रपटाच्या नायिकेच्या नावावर चर्चा केली आणि त्याचं मतंही विचारलं. पण मी नेहमीच निर्णय त्यांच्यावर सोडला आहे आणि भविष्यातही तसाच राहील.