Shiv Thakare : शिव ठाकरे झळकणार रुपेरी पडद्यावर!
'बिग बॉस' फेम शिव ठाकरे सध्या चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'बिग बॉस'च्या माध्यमातून छोटा पडदा गाजवल्यानंतर शिव ठाकरे आता मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज आहे.
शिवच्या आगामी मराठी सिनेमाची निर्मिती अमोल खैरनार करणार आहेत.
हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर शिवला अनेक चांगल्या दर्जाच्या सिनेमांसाठी विचारणा होत आहे.
मराठी सिनेमात झळकण्यासोबत रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमातदेखील शिव ठाकरे सहभागी होणार आहे.
शिव ठाकरेने अनेकदा 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
शिव ठाकरे 'बिग बॉस' आधी एमटीव्हीच्या 'रोडीज' या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला.
शिव हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता आहे. या कार्यक्रमामुळे शिव घराघरांत पोहोचला आहे.
'रोडीज', 'बिग बॉस मराठी' आणि हिंदी बिग बॉस असे एकापेक्षा एक रिअॅलिटी शो शिव ठाकरेने केले आहेत.
'आपला माणूस' म्हणून शिव ठाकरे लोकप्रिय आहे.