बिग बॉसमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी, कधीकाळी सचिन तेंडुलकरशी जोडलं जायचं नाव, अमिताभसोबत चित्रपट करणारी शिल्पा शिरोडकर आहे तरी कोण?
शिल्पा शिरोडकरसध्या बिग बॉस 18' या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये खेळत आहे. सध्या ही कन्टेस्टंट चांगलं खेळताना दिसतेय. दरम्यान, कधीकाळी शिल्पा शिरोडकर या अभिनेत्रीचे नाव थेट सचिन तेंडुलकरशी जोडले जायचे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिल्पा शिरोडकर ही अनिल कपूरवरही प्रेम करायची, असं सांगितलं जातं. विशेष म्हणजे अनिक कपूरही शिल्पावर प्रेम करायचे, असा दावा केला जातो.
मात्र शिल्पा शिरोडकर आणि अनिल कपूर यांचे नाते फार काळ टिकले नाही.
अनिल कपूर यांच्याव्यतिरिक्त भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्याशीही शिल्पा शिरोडकरचे नाव जोडले जायचे.
हे दोघेही मुळचे महाराष्ट्राचे असल्यामुळे ते लवकरच लग्न करणार आहेत, इथपर्यंत तेव्हा चर्चा केल्या जात होत्या. प्रत्यक्ष मात्र तसं काही झालं नाही.
क्रिकेटर सचिन तेंडुलकरने मात्र शिल्पासोबतचं नातं नाकारलं होतं. आमच्यात असं काहीही नाही, असं त्याने स्पष्ट केलं होतं.
शिल्पा शिरोडकर