Astrology : चेहऱ्यावरचे 'हे' तीळ देतात लव्ह मॅरेजचा संकेत; जाणून घ्या ज्योतिष शास्त्रात काय म्हटलंय
पण सामुद्रिक शास्त्रानुसार, महिलांच्या शरीरावर असलेले तीळ हे तुमचं नेमकं लग्न कसं होणार हे सांगतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरंतर, प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची इच्छा असते की आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याच व्यक्तीबरोबर आपलं लग्न व्हावं.
ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या महिलेच्या उजव्या डोळ्यावर तीळ असतो. अशा महिला किंवा मुली पुरुषांना आकर्षित करतात. त्यामुळे हा तीळ लव्ह मॅरेजचा संकेत देतो.
तसेच, तुमच्या कानांवर असलेला तीळ देखील अनेक पुरुषांना आकर्षित करतो. त्यामुळे या मुलींचे देखील लव्ह मॅरेज होऊ शकतात.
ज्या मुलींच्या ओठांवर तीळ असतो. अशा महिला दिसायला सुंदर तर असतातच पण त्या आपल्या सौंदर्याने तसेच, हास्याने इतरांना प्रभावित करतात. अशा मुली प्रेमाच्या बाबतीत देखील प्रामाणिक असतात.
महिलांच्या हातावर असलेला तीळ हा विरुद्ध लिंगाकडे आकर्षित करण्याचा संकेत देतो. अशा मुली प्रेमाच्या बाबतीत एकनिष्ठ असतात.
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या महिलांच्या नाकावर तीळ असतो त्या महिलांच्या नशिबात लव्ह मॅरेजचे संकेत असतात. अशा लोकांना त्यांच्या लाईफ पार्टनरकडून देखील खूप प्रेम मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)