लग्न, मूल झाल्यानं हिरोचा काम करण्यास नकार, वजन वाढल्यानं ट्रोल, लाखोंनी चाहते असलेल्या 'राणी'चे धक्कादायक खुलासे!
Bhojpuri Actress Struggle Story: राणी चटर्जी ही भोजपुरी अभिनेत्री संपूर्ण देशात चांगलीच प्रसिद्ध आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2004 साली ती 'ससुरा बड़ा पइसावाला' या चित्रपटात पहिल्यांदा झळकली.
या चित्रपटानंतर तिने अनेक मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले.
राणी चटर्जी असलेल्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला कमवलेला आहे.
मात्र वाढलेल्या वजनामुळे तिला याआधी अनेकदा ट्रोलिंगला समोरं जावं लागलेलं आहे. विशेष म्हणजे वजन आणि शरीर यामुळे तिला अनेकांनी काम नाकारलेलं आहे.
राणी चटर्जीने स्वत:च याबाबत सांगितलं आहे. तिने नुकेच न्यूज 18 ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपबीती सांगितली.
मी ज्या चित्रपटात काम करणार होते, त्या चित्रपटातील अभिनेत्याने माझ्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला होता.
हिरोईनचे लग्न झालेले आहे. तिले एक मूल आहे, त्यामुळे दुसरी हिरोईन घ्या, अशी मागणी या अभिनेत्याने केली होती, असं राणी चटर्जीने सांगितलं.
तिला सोशल मीडियावर तिच्या वजनामुळे ट्रोल केलं जातं. पण राणी चटर्जी फिटनेस फ्रिक आहे.
ती जिममधील, तिच्या वर्कआऊटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
राणी चटर्जीने 'बंधन टूटे ना' (2005), 'दामाद जी' (2006), 'मुन्ना पांडे बेरोजगार' (2007), 'मुन्नीबाई नौटंकी वाली' (2009) आणि 'देवरा बड़ा सतावेला' यासारख्या हिट ठरलेल्या चित्रपटांत काम केलेलं आहे.
राणी चटर्जी