क्लायमॅक्समध्ये मोठा ट्वीस्ट, संपूर्ण फिल्ममध्ये भरभरुन सस्पेन्स; शेवटच्या 5 मिनिटांत हादरुन जाल
2022 मध्ये एक जबरदस्त चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याच्या कथेनं सर्वांनाच धक्का दिला. चित्रपटात ना कोणी नायक, ना कोणी खलनायक, फक्त कथेनं लोकांची मनं जिंकली. IMDB वर चित्रपटाचे रेटिंग 8 पेक्षा जास्त आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे 'गार्गी'.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'गार्गी' हा तमिळ भाषेत बनलेला ड्रामा-थ्रिलर चित्रपट, ज्यामध्ये सई पल्लवीनं मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्याशिवाय काली वेंकट, आरएस शिवाजी, सरवणन, व्ही, जयप्रकाश हे स्टार्स महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. चित्रपटाची संपूर्ण कथा गार्गी (सई पल्लवी) या पात्राभोवती फिरते, जिला न्यायालयातून आपल्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे.
'गार्गी' चित्रपटाच्या कथेत चार जण मिळून 9 वर्षांच्या मुलीवर एका इमारतीत बलात्कार करतात. गार्गीचे वडील ब्रह्मानंदम (आरएस शिवाजी) हे ज्या इमारतीत घटना घडली, तिथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. पोलीस तपासात 4 नव्हे तर 5 जणांनी मुलीवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे पोलीस ब्रह्मानंदमलाही ताब्यात घेतात. तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांमध्ये गार्गीच्या वडिलांचाही समावेश असल्याची पुष्टी पीडित मुलगीच करते. पण गार्गीला खात्री असते की, तिचे वडील असे घृणास्पद कृत्य करू शकत नाहीत. मग ती तिच्या वडिलांना आधार देते. गार्गी वकिलांसोबत स्वतः सत्य शोधण्यासाठी निघते.
गार्गीच्या वडिलांची या प्रकरणातून सुटका होणार, तेवढ्यात आणखी एक धक्कादायक खुलासा होता आणि संपूर्ण चित्रपटाची पटकथा 360 अंशात फिरते आणि त्यानंतर पाहायला मिळतो, हादरवणारा सस्पेन्स. चित्रपटाची शेवटची 15 मिनिटं अंगावर शहारे आणणारी आहेत.
'गार्गी' चित्रपटाची कथा लहान मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनांवर भाष्य करते, ज्याबद्दल पालकही अनभिज्ञ असतात. आणि ज्या पालकांना कळतं, ते बदनामी होईल, या भीतीनं पोलिसांकडे जात नाहीत.
साई पल्लवीच्या 'गार्गी' चित्रपटाचा तुम्ही घरी बसून आनंद घेऊ शकता. सध्या हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर हिंदी भाषेत उपलब्ध आहे. याचे दिग्दर्शन गौतम रामचंद्रन यांनी केलं आहे.
चित्रपटाची कथा हरिहरन राजू आणि गौतम रामचंद्रन यांनी संयुक्तपणे लिहिली आहे. IMDB वर चित्रपटाचं रेटिंग 10 पैकी 8.1 आहे.
(सर्व फोटो : IMDB)