Shah Rukh Khan च्या पूर्वीही अनेक कलाकार शुटिंग दरम्यान झाले होते जखमी, जॉन अब्राहमच्या तर गळ्याला लागली होती गोळी
अमिताभ बच्चन - सिनेमाच्या शुटिंगदरम्यान जखमी होणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांचा पहिला क्रमांक आहे. कुली सिनेमाच्या सेटवर त्याला जबरदस्त मार लागला होता. हा मार इतका भयकंर होता की, अमिताभ अनेक दिवस रुग्णालयात भरती होता. त्यावेळी अमिताभ डॉक्टरांनी केलेल्या चांगल्या उपचारामुळे मृत्यूच्या दाडबेतून बाहेर आला. परंतु, अजूनही ही जखम अमिताभला अधूनमधून त्रास देत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसैफ अली खान - अभिनेता सैफ अली खान अनेक सिनेमा मारझोड करतानाचे सीन दिले आहेत. त्याचा 2000 साली ‘क्या कहना’ हा सिनेमा पदर्शित झाला होता. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान तो डोक एका दगडावर आदळलं होतं. या अपघातामुळे सैफ गंभीर जखमी झाला होता. ही जखम इतकी भयंकर होती की, त्याच्या डोक्यात जवळपास 100 टाके लागले होते.
ऐश्वर्या राय बच्चन - या यादीत अमिताभ बच्चन यांची सुन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या नावाचाही समावेश आहे. 2004 मध्ये खाकी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान तिची एका जीपला जबर धडक लागली आणि ऐश्वर्याला गंभीर दुखापत झाली होती.
जॉन अब्राहम - बॉलिवूडचा अॅक्शन हिरो जॉन अब्राहमलाही शूटिंगच्या वेळी गंभीर जखमी झाला होता. 2007 मध्ये 'शूटआउट एट लोखंडवाला' सिनेमा आला होता. या सिनेमाच्या एका सीनमध्ये अनिल कपूर त्याच्यावर गोळी मारतो त्यावेळी गोळी जॉनच्या गळ्याला स्पर्श करून गेली होती. दैवबलत्वर म्हणून जॉन बचावला होता.
नर्गिस दत्त - 1957 मदर इंडिया सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान भीषण आग लागली होती. या आगीच्या तावडीत नर्गिस दत्त सापडली होती. त्यावेळी नर्गिसला वाचवण्यासाठी सुनिल दत्तने आगीत उडी मारली होती आणि अभिनेत्रीचा जीव वाचला होता.
शाहरुख खान - बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या अनेक सिनेमाच्या सेटवर गंभीर जखमी झाला होता. यामुळे त्याला अनेक वेळा शस्त्रक्रियाही करावी लागली होती. आता नुकतंच शाहरूख एका सिनेमाच्या सेटवर जखमी झाल्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली आहे. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.