Rekha Latest Pics: एव्हरग्रीन रेखाची घायाळ करणारी अदा, दुबईच्या प्रसिद्ध मासिकासाठी केले फोटोशूट
रेखाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरेखाचे हे फोटो प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्रा याने त्याच्या सोशल मिडियाच्या अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये रेखाने ब्लॅक टॉपसह फ्लोर लेन्थ गोल्डन जॅकेट घातले आहे. जे थ्रेडवर्क, सिक्वेन्स आणि गोल्डन एम्ब्रॉयडरीने डिझाइन केलेले आहे.
या फोटोमध्ये रेखाने क्लासिक गोल्डन साडी नेसली आहे. अभिनेत्रीने तिच्या लुकला लेयर्ड नेकलेस, बांगड्या, कानातले आणि डायमंड रिंगमुळे तिच्या या लूकमध्ये भर पडली आहे.
आणि तिसर्या लूकमध्ये रेखाने तिच्या अप्रतिम अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे.
रेखाने या सुंदर लूकसाठी मॅचिंग फुलांचे झुमके आणि सुंदर कुंदन नेकलेस देखील घातला आहे.
रेखाच्या या फोटोंना सध्या सोशल मिडियावर चांगलीच पसंती मिळताना पाहायला मिळत आहे.
या फोटोशूटमुळे रेखा पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.