Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : 'सोन्या'सारखा माणूस गेला! अलोकेश लाहिरी ते लाडके 'बप्पीदा'; जीवनप्रवास कसा होता?
Bappi Lahiri Passed Away : जवळपास पाच दशके आपल्या संगीत आणि आवाजाने बॉलिवूडवर छाप सोडणारे ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लाहिरी (वय 70) यांचे काल रात्री निधन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आलोकेश लाहिरी असे बप्पी यांचे मूळ नाव होते. बॉलिवूडमध्ये 'बप्पीदा' अशी ओळख असलेले बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत.
त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जुहू येथील क्रिटी बाप्पी लाहिरी केअर हॉस्पिटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला होता.
बप्पीदा यांनी शेकडो चित्रपटांना संगीत दिलं. तसेच अनेक गाणीही स्वत: गायली. त्यातली कित्येक गाणी आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत.
त्यांचे वडील अपरेश लाहिरी तर आई बान्सरी लाहिरी. बप्पी लाहिरींना संगीताचं सुरुवातीची शिक्षण आपल्या घरातच मिळालं.
वयाच्या 17 वर्षापासूनच बप्पी लाहिरी हे संगीतकार होण्याचं ठरवलं होतं. तीन वर्षाचे असल्यापासून ते तबला वादन शिकले
त्यांची प्रेरणा होते एसडी बर्मन. एसडी बर्मन यांची गाणी ऐकूण ते रियाज करायचे.
त्यांनी बॉलिवूडला रॉक आणि डिस्कोशी नवी ओळख करुन दिली. संपूर्ण देशाला आपल्या गीतांवर थिरकायला भाग पाडलं चलते चलते, डिस्को डांसर, शराबी अशा एकाहून एक सरस चित्रपटांना संगीताचा साज चढवत त्यांनी 80चं दशक चांगलंच गाजवलं
चलते चलते, डिस्को डांसर, शराबी अशा एकाहून एक सरस चित्रपटांना संगीताचा साज चढवत त्यांनी 80चं दशक चांगलंच गाजवलं बागी 3 चित्रपटातलं भंकस हे गाणं त्यांचं शेवटचं गाणं ठरलं.