Atul Parchure Funeral: अतुल परचुरेंना अखेरचा निरोप देताना कलाकार गलबलले, रंगभूमीचा मोती निखळल्याच्या भावनेनं हमसून रडले..
कलाक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीतील सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकाऱ्यांसह दिग्गजांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदादर मधील शिवाजी पार्क हिंदू स्मशानभूमी त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अतुल परचुरे यांचे पार्थिव दाखल होताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
महेश मांजरेकर म्हणाले, माझी व्यक्तिगत शक्ती आहे. आम्ही दोघांनी सुरुवात १९८४ साली केली. ४० वर्ष आम्ही सोबत होतो. आम्हाला प्रजेक्ट सोबत आता करायचा होता. मराठी नटांचे बरं असतं की ते भेटत असतात.ते रिहर्सल करत होता, पुन्हा परतत होता . मात्र जे झालं ते दु:खद आहे.
श्रेयस तळपदे: कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकाचा संबंध आला तेव्हा आपल्याला असं करता येईल का शिकत गेलो.त्यांच्या कडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.इतक्या मोठ्या आजारातून बाहेर पडलेत ही ती वेळ नव्हती . तो खूप मोठा नट होता इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालंय
रंगभूमीवरचा प्रवेश, मालिकांमधील हळव्या भूमिका आणि सिनेमांमधलं अचूक टाइमिंग साधत अतुल परचुरे हे नाव कलाकार म्हणून प्रेक्षकांचे मनावर कोरल गेलं.
अतुल परचुरे यांच्यासोबत रंगमंचावर अनेक वर्ष काम केलेल्या निर्मिती सावंतही अतुल परचुरे यांच्या अंत्यस्कारासाठी उपस्थित होत्या.
सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांना अतुल परचुरेंच्या जाण्यानं मोठं दु:ख झालं आहे. अतुल परचुरे यांचं पार्थिव येताच सुमित्रांना अश्रू अनावर झाले होते.