मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकPHOTO: वामिकाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून अनुष्का नाराज; म्हणाली..
PHOTO: वामिकाचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहून अनुष्का नाराज; म्हणाली..
Written By : abp majha web team | Updated at : 24 Jan 2022 03:54 PM (IST)
vamika
1/5
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन येथे खेळण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली- अनुष्काची मुलगी वामिकाची (Vamika kohli) पहिली झलक पाहायला मिळाली.
2/5
त्यानंतर सोशल मीडियावर विमिकाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. याआधी विराट आणि अनुष्कानं कधीच त्यांच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाहीत. एवढेच नव्हे तर, कधीच त्यांनी तिचा चेहराही दाखवला नाही. खरंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर वामिकाचा चेहरा दिसत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
3/5
अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट केली आहे. ज्यात तिनं असं म्हटलंय की, " काल स्टेडिअममध्ये असताना आमच्या मुलीचे फोटो क्लिक करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. आम्ही तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की, आम्हाला अचानक कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यात आलं. कॅमेरा आमच्यावर आहे, याची आम्हाला माहीत नव्हती. या विषयावर आमची भूमिका आणि विनंती पूर्वीसारखीच आहे. वामिकाचे फोटो क्लिक करून सोशल मीडियावर व्हायरल न केल्यास आम्हाला आनंद होईल. याचं कारण आम्ही आधीच सांगितलं आहे. धन्यवाद."
4/5
विराट कोहली आणि अनुष्का नेहमीच आपली मुलगी वामिकाला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.
5/5
अनेकदा त्यांनी फोटो काढू नये तसंच प्रसिद्ध करु नयेत यासाठी विनंतीही केली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाचा वामिका समोर आली. जोपर्यंत आपल्या मुलीला सोशल मीडियाबद्दल कळत नाही, तोपर्यंत तिला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय विराट आणि अनुष्कानं घेतलाय. (all photo: anishka sharma / ig)