एक्स्प्लोर
Ankita Lokhande: माझ्याकडे टॅलेंट असूनही ते दाखवण्याची संधी मला मिळाली नाही, अंकिता लोखंडेने सांगितली स्ट्रगल स्टोरी!
(photo:lokhandeankita/ig)
1/6

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विक्की जैन हे स्मार्ट जोडी (Smart Jodi)या कार्यक्रमाचे विजेते ठरले आहेत.(photo:lokhandeankita/ig)
2/6

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अंकितानं तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत प्रेक्षकांना सांगितलं. तिनं सांगितलं की तिचा इंडस्ट्रीमध्ये कोणीही गॉडफादर नाही. तसेच ती म्हणली की, माझ्याकडे टॅलेंट असूनही ते दाखवण्याची संधी मला मिळाली नाही. (photo:lokhandeankita/ig)
3/6

मुलाखतीमध्ये अंकिता म्हणाली, इंडस्ट्रीमध्ये माझा कोणीही गॉडफादर नाही. त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप कठिण होता. चित्रपटांमध्ये असणाऱ्या छोट्या भूमिकांबद्दल अंकिता म्हणाली, चित्रपटामधील किती वेळाचा आहे? या गोष्टीचा फरक पडत नाही. फक्त भूमिका चांगली असणे गरजेचे आहे. (photo:lokhandeankita/ig)
4/6

मणिकर्णिका, बाघी-3 या चित्रपटांमध्ये अंकितानं काम केलं. तसेच पवित्र रिश्ता या मालिकेमधील अभिनयामुळे अंकिताला विशेष लोकप्रियता मिळाली. (photo:lokhandeankita/ig)
5/6

अंकिता आणि विकी हे स्मार्ट जोडी या कार्यक्रमाचे विजेते ठरले आहेत. अंकिता-विकीला ‘स्मार्ट जोडी’ची ट्रॉफी तसेच, 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत.(photo:lokhandeankita/ig)
6/6

अंकिता-विकी व्यतिरिक्त, बलराज-दीप्ती आणि भाग्यश्री-हिमालय दासानी यांनी या शोमध्ये टॉप 3 मध्ये आपले स्थान निर्माण केले होते. अंकिता आणि विकीच्या या कार्यकमामधील केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. रिपोर्टनुसार या कार्यक्रमाच्या एका एपिसोडचे विकी आणि अंकिता 7 लाख रूपये मानधन घेतात.(photo:lokhandeankita/ig)
Published at : 06 Jun 2022 01:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























