Rhea Kapoor | अनिल कपूरची धाकटी लेक रिया कपूर अडकली विवाहबंधनात, पाहा तिचा हटके ब्रायडल लुक
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची धाकटी लेक रिया 14 ऑगस्टला कुटुंबातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण बुलानीशी विवाहबंधनात अडकली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरियाने अनिल कपूरच्या जुहू स्थित बंगल्यामध्ये लग्न केले. दोन दिवसानंतर रियाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहे.
रियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. रिया आणि करण एकमेकांना गेल्या 12 वर्षांपासून ओळखत आहेत.
रिया कपूरने तिच्या लग्नात आईचे दागिने परिधान केले आहे. रिया या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
रियाने पांढऱ्या रंगाची गोल्डन वर्क असणारी साडी नेसली असून त्यावर जाळीची ओढणी घेतली आहे.
रियाने पारंपरिक लुकला फाटा देत हटके लुक परिधान केला होता.
रियाच्या लग्नाला चुलत भाऊ अर्जुन कपूर, खुशी कपूर, शनाया कपूर, अंशुला कपूर उपस्थित होते. तसेच संजय कपूर, बोनी कपूर, आणि महीप कपूर यांच्यासह अनेकांनी लग्नाला हजेरी लावली.
रिया ही एका फॅशन ब्रँडची ओनर तसेच ती चित्रपट निर्माती देखील आहे.