एक्स्प्लोर
Ananya Pandey: अनन्याची तुलना अभिनेत्री उर्फी जावेदसोबत?

(photo:ananyapanday/ig)
1/8

Ananya Panday : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने खूप कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. (photo:ananyapanday/ig)
2/8

अनन्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे नव-नवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (photo:ananyapanday/ig)
3/8

चाहत्यांकडूनही तिच्या फोटोंचे कौतुक केले जाते. परंतु, आता अनन्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे अनन्याच्या मदतीला वडील चंकी पांडे धावून आले आहेत. (photo:ananyapanday/ig)
4/8

अनन्या पांडे अपूर्व मेहता यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीसाठी तिने परिधान केलेला पोशाख खूप चर्चेत होता. त्यावरूनच तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. (photo:ananyapanday/ig)
5/8

अनन्या या पार्टीमध्ये कॉर्सेट बॉडीसूटसह काळ्या थाई-हाय स्लिट शीअर ड्रेस परिधान करून सहभागी झाली होती. तिच्या या पोशाखातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. (photo:ananyapanday/ig)
6/8

अनेकांनी तिची तुलना अभिनेत्री उर्फी जावेदसोबत केली. तर काही लोकांनी तिच्या ड्रेसअपला खूपच वाईट असल्याचे म्हटले आहे.(photo:ananyapanday/ig)
7/8

नेटकऱ्यांच्या या कमेंट्समुळे वडील चंकी पांडे यांनी अनन्याच्या कपड्यांवर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "पालक म्हणून आम्ही तिला तिने कशी कडपे घालावीत याबद्दल कधीच सांगितले नाही. आम्ही आमच्या दोन्ही मुलींना खूप चांगले वाढवले आहे आणि त्या खूप हुशारही आहेत." (photo:ananyapanday/ig)
8/8

"अनन्या ज्या इंडस्ट्रीत काम करत आहे, त्या इंडस्ट्रीत तिला ग्लॅमरस दिसण्याची खूप गरज आहे. मला माझ्या मुलींबद्दल एक गोष्ट पक्की माहीत आहे की, त्यांच्यात एक निरागसता आहे. त्या ज्या कपडे परिधान करतात त्यावर हसणे साहजिक आहे. परंतु, ते आपण कौतुक म्हणून घेतले पाहिजे. असे कपडे परिधान करण्यासाठी तिच्या वडिलांचा आक्षेप नसेल तर कुणाला वाईट वाटू नये असे मला वाटते. " असे चंकी पांडे यांनी म्हटले आहे. (photo:ananyapanday/ig)
Published at : 22 Mar 2022 12:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ठाणे
राजकारण
नागपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
