आलिया भट्ट होणार रणबीर कपूरची नवरी, खास सोहळ्यासाठी घालणार या प्रसिद्ध डिझायनरचा पोशाख!

बॉलीवूडमधील प्रत्येक जोडप्याच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक लहान मोठे तपशील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.मग ती लग्नाची तारीख असो, लग्नाचे ठिकाण किंवा लग्नाचा पोशाख.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या आलिया भट्ट आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत नववधू कोणते डिझायनर पोशाख घालतील हा प्रश्न विचारला जात आहे.

सर्वांना माहीत आहे की, रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आता लग्नाची तारीख समोर आली असून, प्रत्येक दिवसागणिक लग्नाबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे.
पाहुण्यांच्या यादीपासून ते स्थळापर्यंत सर्वच गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान, नववधूच्या वेशभूषेबाबत चर्चांना उधाण आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जीचा पोशाख परिधान करणार आहे.
याआधी कतरिना कैफ-विकी कौशल, करिश्मा तन्ना, मौनी रॉय-सूरज नांबियार, प्रियांका चोप्रा-निक जोनास, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, अनुष्का शर्मा-विराट कोहली, पत्रलेखा पॉल-राजकुमार राव यांसारखे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी या खास दिवसासाठी सब्यसाचीची निवड केली.