Adil Durrani: दुसऱ्या लग्नानंतर आदिल दुर्रानीने राखी सावंतवर केला चोरीचा आरोप!
ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिचा माजी पती आदिल खान यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराखीपासून वेगळे झाल्यानंतर आदिलने नुकतेच बिग बॉस १२ फेम सोमी खानशी लग्न केले.
राखी सावंतला तिच्या एक्स पतीचे हे लग्न आवडले नाहीत.ती सतत या जोडप्यावर हल्ला करत होती. आता आदिलनेही राखीवर मोठा आरोप केला आहे.
आदिलने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. तो म्हणाला, 'राखीला लोकांचे पैसे चोरण्याची सवय आहे. त्यांना फसवणूक करण्याची सवय आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे गेले आहे आणि आनंदी आहे हे राखीला अजिबात पचवता येत नाही. ती एक कपटी आणि ढोंगी स्त्री आहे.
ती चर्चेत राहावी म्हणून मुद्दाम अशा गोष्टी बोलते. ती वेडी झाली आहे असेही आदिल म्हणाला.
राखी सावंतपासून विभक्त झाल्यानंतर 2 मार्च रोजी आदिल दुर्रानीने 'बिग बॉस 12' फेम सोमी खानसोबत जयपूरमध्ये गुपचूप लग्न केले.
काही दिवसांनंतर आदिलने फोटो शेअर करून सोमीसोबतच्या लग्नाची घोषणा केली होती आणि म्हणाला - 'हे माझे पहिले लग्न आहे'.
सोमी खानच्या आधी आदिल दुर्रानीने राखी सावंतशी लग्न केले होते. मात्र काही वेळानंतर राखीने आदिलवर फसवणूक आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला.
यानंतर आदिललाही अटक करण्यात आली. मात्र, काही वेळाने आदिलची सुटका झाली.(pc:iamadilkhandurrani/ig)