Fitness Tips : स्टॅमिना वाढवण्यासाठी करा या गोष्टी, कोणत्याही सप्लीमेंट्सची गरज भासणार नाही !

तज्ज्ञ फिट राहण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला देतात. रोजच्या काही वर्कआऊटमुळे तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण तर ठेवू शकताच, शिवाय अनेक आजारांचा धोकाही टाळू शकता आणि आपल्या शरीरासाठी काही मिनिटे घेऊन तुम्ही वृद्धत्वाचा परिणामही थांबवू शकता, पण रुटीनमध्ये व्यायामाचा समावेश करणं इतकं सोपं नसतं. कधी शरीर साथ देत नाही, कधी आळस आड येतो, तर कधी व्यायाम सुरू केल्यानंतर लगेचच थकवा जाणवू लागतो. ज्यामुळे फिट राहणे खरोखर चॅलेंज बनते(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केरळची जुनी आणि प्रसिद्ध मार्शल आर्ट 'कलरीपयट्टू' शिकवणाऱ्यांनी अशा सुपर सोप्या टिप्स दिल्या आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही कोणत्याही सप्लीमेंट्स किंवा एनर्जी ड्रिंक्सशिवाय शरीराची स्टॅमिना वाढवू शकता. केरळच्या मध्य आणि उत्तर भागात तसेच कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आजूबाजूच्या भागात कलरीपयट्टू ही एक प्रसिद्ध मार्शल आर्ट आहे. या कलेत हात-पायाबरोबरच काठी, तलवारीच्या माध्यमातून स्वसंरक्षणाच्या पद्धती शिकवल्या जातात. त्यांनी शेअर केलेल्या टिप्स आहेत . (Photo Credit : pexels )

भरपूर झोप घ्यावी लागते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे, परंतु त्यासाठी झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. म्हणजे रात्री वेळेवर झोपा आणि सकाळी ही वेळेवर उठा. जर तुम्ही रात्री उशीरा झोपून सकाळी 11-12 वाजेपर्यंत झोपत असाल तर हा योग्य मार्ग नाही. (Photo Credit : pexels )
वेळेवर खाण्याची सवय लावा. त्यामुळे मोठा फरक पडतो. ब्रेकफास्टपासून लंच, डिनरपर्यंत वेळ ठरवा. रात्रीचे जेवण झोपण्याच्या दोन तास आधी करा. (Photo Credit : pexels )
तसेच रात्रीचे जेवण 7 ते 8 च्या दरम्यान करा आणि रात्री 10 वाजेपर्यंत झोपा. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल, ज्याचा वापर तुम्ही वर्कआऊटमध्ये करू शकता.(Photo Credit : pexels )
अन्न चावून खा. ही टिप तुम्हाला विचित्र वाटेल, पण खूप उपयोगी आहे.अन्न चघळल्याने अन्न पचवण्यासाठी पोटाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, त्यामुळे तुमची ऊर्जा वाया जात नाही, ज्याचा वापर तुम्ही वर्कआऊटमध्ये करू शकता. त्यामुळे या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही सहज स्टॅमिना मिळवू शकता. (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )