फिटनेस आणि सौंदर्याने तरुणाईला लाजवणाऱ्या अभिनेत्री श्वेता तिवारीचा देसी लूक; पाहा फोटो!
अभिनेत्री श्वेता तिवारी हे टेलिव्हिज इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्वेता तिवारी भोजपुरी इंडस्ट्रीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
छोट्या पडद्यावरील 'कसौटी जिंदगी के' या टीव्ही मालिकेतून श्वेता तिवारी हे नाव घराघरात पोहोचलं.
'कसौटी जिंदगी के' मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेतून श्वेताने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. यासोबतच तिने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे.
श्वेता तिवारीला प्रोफेशनल लाईफसोबत पर्सनल लाईफमध्येही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण, यावरही ती जिद्दीने मात करत पुढे आली.
श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं, पण या लग्नामुळे तिला खूप त्रास झाला. अखेर तिने 2007 मध्ये राजाला घटस्फोट दिला. यानंतर तिचं अभिनव कोहलीवर प्रेम जडलं, पण हे नातंही फार काळ टिकलं नाही.
श्वेता नेहमीच तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते नुकतेच तिने खास साडीमधलं फोटोशूट शेअर केलं आहे.
या लाल रंगाच्या साडीत श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.