Enviro Infra Engineers IPO : लिस्टिंगवर दमदार परतावा, आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, शेअर कितीवर पोहोचला
एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. या आयपीओनं गुंतवणकदारांना प्रतिशेअर 72 रुपये परतावा दिला आहे.या आयपीओची बीएसई आणि एनएसईवर दमदार लिस्टींग झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना 48 टक्के परतावा दिला. आयपीओ लिस्ट झाल्यानंतर शेअरमध्ये थोडी घसरण पाहायला मिळाली.
विशेष बाब म्हणजे हा आयपीओ 89 पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओ लिस्ट होताना जीएमपीपेक्षा अधिक परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहे.
एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओच्या एका लॉटमध्ये 101 शेअर क्रेडिट करण्यात आले होते. त्यानुसार साधारणपणे गुंतवणूकदारांना 7200 रुपयांचा फायदा झाला आहे.
एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सकडून भांडवली बाजारातून 650 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला गेला होता. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)