Shriya Pilgaonkar : श्रिया पिळगावकरचा मनमोहक लूक; चाहते घायाळ!
श्रिया पिळगावकरचा जन्म २५ एप्रिल १९८९ रोजी चित्रपटसृष्टीच्या या रंगीबेरंगी दुनियेतील दोन कलाकारांच्या कुटुंबात झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफिल्मी घराण्यातील श्रिया आयुष्याच्या सुरुवातीपासूनच अभिनयात गुंतलेली आहे, त्यामुळेच अभिनेत्रीचा लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता.
शिक्षणासोबतच श्रियाने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी अभिनयाच्या जगात प्रवेश केला. 'तू तू मैं मैं' या टीव्ही शोमध्ये ती पहिल्यांदा बालकलाकार म्हणून दिसली होती.
2012 मध्ये ती करण शेट्टीच्या 'फ्रीडम ऑफ लव्ह' या 10 मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती. या चित्रपटातूनच श्रियाची अष्टपैलू प्रतिभा दिसून आली, कारण या चित्रपटात तिने केवळ अभिनयच केला नाही तर गायन आणि नृत्य सादरीकरण देखील केले.
मात्र, त्यानंतर तिने आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, श्रियाने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात ग्रॅज्युएशन केले.
यानंतर तिने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे आणि हार्वर्ड समर स्कूल, यूएसए मधून अभिनयाचा डिप्लोमा केला.
अभिनय क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रिया पिळगावकर भारतात परतली आणि तिने पुन्हा एकदा अभिनयाला सुरुवात केली आणि सहा वर्षांनी ओटीटीमध्ये प्रवेश केला.
श्रिया सोशल मिडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते, ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकताच तिने तिचा एक खास लूक इंस्टाग्रामवर शेअर केलाय, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
श्रिया यात देसी लूक मध्ये दिसत आहे. तिने हिरव्या रंगाचाअनारकली ड्रेस परिधान केलाय ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.