Vastu Tips : काहीही करा, पण स्वयंपाकघरातील 'या' गोष्टी संपू देऊ नका; गरिबी येईल चालून, शास्त्र सांगते...
आपल्या घरातील संपत्ती आपल्या घरीच राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण नकळत आपल्याकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे घरात गरिबी चालून येते. त्यामुळे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदू धर्मात घराला मंदिराचा दर्जा दिला जातो. घरात सुख-समृद्धी असेल तर संसार सुखाचा होतो. त्यातल्या त्यात स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचं स्थान आहे, कारण तिथे देवी अन्नपूर्णा वास करते.
किचनमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू ठेवल्या जातात, ज्याचा वापर रोज अन्न शिजवण्यासाठी केला जातो. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील काही वस्तू या कधीही पूर्ण संपू येऊ देऊ नये, अन्यथा घरात गरिबी वास करते. या गोष्टी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
पीठ : पीठाचा डबा कधीही पूर्णपणे रिकामा होऊ देऊ नये. घरात अतिरिक्त पीठ घरी ठेवण्याची सवय लावा. पीठ पूर्णपणे संपणं अशुभ मानलं जातं.
तांदूळ: घरात भात घालण्यासाठी दररोज तांदळाचा वापर होतो. स्वयंपाकघरातून तांदूळ पूर्णपणे संपू देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार, तांदळाचा डबा पूर्णपणे रिकामे ठेवल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो.
हळद : हळदीचा वापर स्वयंपाकात केला जातो. याशिवाय धार्मिक आणि शुभ कार्यातही हळद शुभ मानली जाते. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्मही आढळतात. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील हळद संपल्याने सुख आणि सौभाग्याचा अभाव होतो. त्यामुळे हळदीचा डबा नेहमी भरलेला ठेवावा.
मीठ : मीठाशिवाय जेवणाची चव अपूर्ण असते. परंतु मीठ संपल्याने तुमच्या घरात गरिबी येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील मीठ संपते तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.