PHOTO : पंजाब दी कुडी इज बॅक! एअरपोर्टवर दिसला शहनाझ गिलचा देसी लूक!
कुटुंबियांसोबत आनंदाचे क्षण घालवून, चेहऱ्यावर लांबलचक हसू घेऊन अभिनेत्री शहनाज गिल मुंबईत परतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई विमानतळावर शहनाज गिलला मीडियाच्या कॅमेऱ्यांनी घेरले होते. यादरम्यान शहनाजच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून चाहत्यांच्या हृदयात आनंदाचे उधाण आले.
यावेळी शहनाज गिल लेव्हेंडर रंगाच्या सलवार सूटमध्ये खूप सुंदर दिसत होती. यासोबत तिने घट्ट पोनीटेलची हेअरस्टाईल कॅरी केली होती.
आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने सोनेरी हिल्ससह साधे कानातले देखील परिधान केले होते. शहनाजने मुंबईत पाऊल ठेवताच मीडियाच्या कॅमेऱ्यांनी तिला घेरले आणि तिच्याशी भरपूर गप्पा मारल्या.
शहनाजच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. त्याच वेळी, तिच्या साधेपणावर चाहत्यांचे हृदय भाळले आहे.
शहनाज गिलचे हे फोटो पाहून युजर्स कमेंट करत आहेत की, ‘शहनाज, तू अशीच हसत राहा. तू खुश असशील तर आम्ही खुश...’