Photo : महाबीजकडून सोयाबीन बियाण्यात फसवणूक; शेतकऱ्यांना फटका
बारामतीच्या शेतकऱ्यांना महाबीजच्या दुय्यम बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. महाबीजकडून आपली फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्यांनी महाबीजकडून बियाणे घेतले, परंतु त्याला फुले किंवा शेंगा आल्या नसल्याची तक्रार शेतकऱ्यांची आहे.
ज्यांनी खाजगी कंपनीचे बियाणे घेतले त्यांच्या पिकाला मात्र फटका बसला नाही.
शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात प्रत्येकी तीन एकरावर सोयाबीनची लागण केली. परंतु म्हणावे त्या प्रमाणात त्यांच्या पिकाला फुलं लागली नाहीत.
परिणामी सोयाबीनच्या झाडाला शेंगा कमी प्रमाणात लागल्या आहेत. महाबीजने घालून दिलेल्या अटीप्रमाणे त्यांनी पिकांचे नियोजन केले ,परंतु तोंडाचा घास हिरावून घेतल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
फसवणूक प्रकरणी अनेक तक्रारी कृषी खात्याला प्राप्त झाल्या असल्याचे कृषी अधिकारी यांचं म्हणणं आहे.
कृषी खातं आणि महाबीजचे अधिकारी तक्रारदार शेतकऱ्यांच्या प्लॉटची पाहणी करणार असल्याचे कृषी खात्याचे म्हणणं आहे.
महाबीजने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.