PHOTO: मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी हटके आणि बोल्ड लुकने चर्चेत; पाहा फोटो!
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी हटके आणि बोल्ड लुकने चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून सई ताम्हणकर तिच्या वेगवेगळ्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या यशाच्या शिखरावर आहे
आगामी काळात ती 'ग्राउंड झीरो', 'अग्नी', 'डब्बा कार्टेल', 'मटका किंग', 'गुलकंद', 'असंभव', 'बोल बोल राणी' अशा विविध हिंदी-मराठी सिनेमात दिसणार आहे.
सई एका इंग्रजी प्रोजेक्टवर काम करत असल्याचेही समोर आले होते.
२०२४ हे वर्ष तिच्यासाठी सर्वात व्यग्र असणारे वर्ष होतेच, पण २०२५ हे वर्षही असेच असेल असे चित्र आहे.
सईच्या सुरुवातीच्या काळातील मालिकांविषयी बोलायचे झाल्यास तिने 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'तुझ्याविना', 'कस्तुरी', 'अनुबंध' या मालिकांमध्ये काम केले आहे.
अभिनेत्रीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. सध्या तिच्या या लुकची जोरदार चर्चा होत आहे.
स्काय ब्लु रंगाच्या ड्रेसमध्ये सईने केलेलं हे फोटोशूट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.