देसीगर्ल प्रियांकाची परी दिसते तरी कशी? पाहा जोनस मॅडमचे लेकीसोबतचे खास Unseen Photo
Priyanka Chopra With Daughter: सध्या विदेशात वास्तव्यास असली तरी अभिनेत्री प्रियांका चोप्राची भारतात नेहमीच चर्चा होत असते. तिला मालती मेरी नावाची मुलगी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच प्रियांका चोप्राने आपल्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. तिच्या पतीचे नाव निक जोनस असे असून तो एक प्रसिद्ध गायक आहे.
दरम्यान, प्रियांका चोप्राने तिच्या मुलीसोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
प्रियांका चोप्राची मुलगी फारच क्यूट दिसत आहे. विशेष म्हणजे तिलाही मेकअपची फारच आवड असल्याचं दिसतंय.
प्रियांकाने पोस्ट केलेल्या एका फोटोमध्ये मालती आपली नखं दाखवताना दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना प्रियांका चोप्राने लिटल मॅजिक मुव्हमेंट्स असं समर्पक कॅप्शन दिलंय. तिने शेअर केलेले हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
मालती मेरीचा जन्म 15 जानेवारी 2022 रोजी सरोगसीच्या माध्यमातून झाला होता.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं लग्न 2018 साली झालं होतं. त्यांचा विवाहसोहळा राजस्थानमधील जोधपूर येथे पार पडला होता.
प्रियांका चोप्राची मुलगी
प्रियांका चोप्रा आणि तिची मुलगी.