Vastu Tips : 'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
वास्तूशास्त्रानुसार, देव्हाऱ्यात कधीही शनी देव आणि काली माताची मूर्ती ठेवू नये. वास्तूशास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच, काल भैरवची मूर्तीसुद्धा घरातील देव्हाऱ्यात ठेवू नये. कालभैरव देव हा भगवान शंकराचं रौद्र स्वरुप आहे.
देवी दुर्गेचं महिषासुर मर्दिनी रुप, तसेच, देवी चंडिकेचं रौद्र रुप अशा देवी-दैवतांचे फोटो कधीही घरात लावू नये असं वास्तूशास्त्रात सांगितलं आहे.
ब्रह्मदेव सृष्टीचे निर्माते आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का घरातील देव्हाऱ्यात किंवा बाहेर कधीच यांची पूजा केली जात नाही. याचं कारण म्हणजे माता सावित्रीच्या शापामुळे ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही.
पूजेच्या खोलीत तुटलेली मूर्ती ठेवू नये, त्यामुळे वास्तूदोष होतात.
घरातील देव्हारा नेहमी ईशान्य दिशेला असावा. या दिशेने जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)