Payal Rohatgi: पायलच्या अटकेबद्दल संग्राम सिंग संतापला; पोलिसांना पैसे देऊन अटक केल्याचा आरोप
वादग्रस्त अभिनेत्री आणि बिग बॉस फेम पायल रोहतगीच्या अटकेनंतर तिचा जोडीदार आणि कुस्तीपटू संग्राम सिंह संतापला आहे. पायल रोहतगीच्या अटकेची बातमी समजताच संग्राम सिंह मुंबईहून अहमदाबादला पोहोचला. पायलला अटक करण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांनी पोलिसांना आधीच पैसे दिले होते, असा आरोप संग्रामने केला आहे. पायलला शुक्रवारी अहमदाबाद पोलिसांनी अटक केली.(Photo : @payalrohatgi instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपायलवर सोसायटीच्या अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. (Photo : @payalrohatgi instagram)
सोसायटीची सदस्य नसतानाही पायल 20 जून रोजी सोसायटीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत आली होती. मात्र, तिला बैठकीत बोलून दिलं नाही. त्यामुळे संतापलेल्या पायलने सभेत शिवीगाळ करत सदस्यांसोबत वाद घातला. (Photo : @payalrohatgi instagram)
सोसायटीच्या तक्रारीनुसार पायलने यापूर्वीही बर्याचवेळा वाद घातला आहे. अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिच्यावर ठेवण्यात आला आहे. ही संपूर्ण बाब अहमदाबादच्या सुंदरबन एपिटॉम सोसायटीची आहे.(Photo : @payalrohatgi instagram)
यावर पायलचा पती संग्राम सिंहने सोसायटीच्या सदस्यांवर आरोप लावले आहेत. पायल घरात किंवा इमारतीच्या आवारात कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ बनवण्यास सोसायटीचा आक्षेप असायचा. (Photo : @payalrohatgi instagram)
संग्रामच्या म्हणण्यानुसार सोसायटी पायलच्या कुटुंबीयांकडून 5 लाखांचा विकासनिधी मागत होते. हाच सोसायटी आणि पायल यांच्यातील वादाचा मुद्दा होता. (Photo : @payalrohatgi instagram)
पायल रोहतगी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती अनेक विषयांवर आपले मत मांडत असते. यामुळे बर्याचवेळा तिला वादाचा सामना करावा लागतो. (Photo : @payalrohatgi instagram)