In Pics : OBC Reservation साठी भाजप आक्रमक, राज्यभर आंदोलन

Feature_Photo_3_(9)

1/8
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानं राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरुन भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं.
2/8
यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं.
3/8
या आंदोलनात ठिकठिकाणी सहभागी स्त्री पुरुष कार्यकर्त्यानी रस्त्यावर बसकण मारल्याने त्या-त्या परिसरातील वाहतूक काही काळ खोळंबली होती. यावेळी राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
4/8
नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.
5/8
मुलुंड इथल्या आनंदनगर टोलनाक्यावर भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आशिष शेलार यांच्यासह सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
6/8
पुण्यात माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्काजाम आंदोलन झालं.
7/8
बीडमध्ये खासदार प्रितम मुंडेंच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
8/8
कोल्हापुरातही वेगवेगळ्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
Sponsored Links by Taboola