Palak Tiwari : पारंपरिक लूकमध्ये खुललं पलक तिवारीचं सौंदर्य; पाहा फोटो

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी नेहमीच चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक पाहून चाहत्यांना फार आवडतो. कोणत्याही फंक्शनला जाण्यासाठी तुम्ही पलकची स्टाइल फॉलो करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लग्न असो किंवा एंगेजमेंट, प्रत्येक मुलगी अशा फंक्शन्सला जाण्यासाठी एकापेक्षा जास्त ड्रेस ट्राय करते जेणेकरून ती सर्वात सुंदर दिसावी. पलक तिवारीचा हा लूक तुम्ही पाहू शकता.

जर तुम्हाला लेहेंगा आवडत असेल तर लाल रंगाचा लेहेंगा निवडणं सर्वोत्तम ठरू शकतं. अभिनेत्री पलक तिवारीचा हा लाल रंगाचा लेहेंगा खूपच क्यूट दिसतो आहे.
पलक तिवारी तिच्या बोल्ड लूक ते एथनिक लूकमध्ये दिसली आहे. तिचा पारंपारिक लूक चाहत्यांना खूप आवडतो. यामुळेच पलकला सोशल मीडियावर चाहत्यांकडून खूप पसंती मिळतेय.
जर तुम्हाला एथनिक लूकमध्ये स्टनिंग लूक हवा असेल तर तुम्ही पलक तिवारीच्या फॅशनच्या टिप्स घेऊ शकता. पलक तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत राहते.
पलकच्या लूकची सध्या सगळीकडे चर्चा आहे. वेस्टर्न लूक असो किंवा ट्रेडिशनल लूक, दोन्ही आउटफिट्समध्ये पलक खूपच स्टायलिश दिसते.
जर तुम्हाला हळदीच्या कार्यक्रमाला जायचं असेल तर पलक तिवारीसारखा पिवळा लेहेंगा तुम्ही घालू शकता. जर तुम्ही स्वतःला अशा प्रकारे तयार केलं तर तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसाल.
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये पलकच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येतेय. हा लूक पूर्ण करण्यासाठी पलकने आपले केस मोकळे सोडले आहेत आणि हलका मेकअप केला आहे.