Photo: शेअर बाजार वधारला, Sensex 909 अंकांनी वाढला
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज बाजारात चांगलीच तेजी आल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज 909 अंकानी वाढला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेन्सेक्समध्ये आज 1.52 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,841 अंकांवर पोहोचला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशाक निफ्टीमध्ये आज 243 अंकांची वाढ झाली. निफ्टीमध्ये आज 1.38 अकांची वाढ होऊन तो 17,854 अंकांवर पोहोचला.
बँक निफ्टीमध्येही आज 830 अंकांची वाढ होऊन तो 41,499 अंकांवर पोहोचला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून घसरण होत असलेल्या अदानी एंटरप्राजझेसचे शेअर्स आज सावरल्याचं दिसून आलं आहे.
आज बाजार बंद होताना एकून 1304 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2128 शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 127 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
शेअर बाजाराची सुरुवात आज तेजीने झाली. नंतरच्या काही काळासाठी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं, पण दुपारनंतर पुन्हा एकदा दोन्ही निर्देशांक वधारले.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 223 अंकांची वाढ झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आज चांगलाच नफा कमावल्याचं दिसून येतंय.
आज बँकिंग शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात तेजी असल्याचं दिसून आलं. निफ्टी बँकच्या 12 पैकी 11 शेअर्समध्ये आज वाढ झाली.