Agriculture News: शेतकऱ्यांना दिलासा, मागणी वाढली, केळीच्या दरात तेजी
सध्या केळीच्या दरात चांगली वाढ (Banana Price) होत आहे. त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Banana Farmers) दिलासा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जात असते.
नंदूरबार जिल्ह्यात मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या लागवडीसाठी आतापासूनच केळीच्या रोपांची बुकिंग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केळीला प्रचंड मागणी वाढल्यानं व्यापारीही चांगल्या दरात केळी खरेदी करत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळीला मोठी मागणी वाढली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरांमध्ये चांगली वाढ झाली आहे.
पिल बागेला 1 हजार 400 ते 1 हजार 700 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी केळीच्या रोपांची बुकिंग सुरू केली असून केळीची रोपे वेळेवर मिळावीत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी चार महिन्यापूर्वी केळीचे रोप बुक करुन ती वेळेवर न मिळाल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीला मिळणारा चांगला दर हा वर्षभर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
लागवडीसाठी केळीच्या रोपांची बुकिंगही सुरू झाली आहे