Mrunmayee Deshpande | अन् 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' शोमध्ये सर्वांच्या नजरा मृण्मयी देशपांडेवरच खिळल्या
झी मराठी वरील लोकप्रिय कार्यक्रम 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे नवे पर्व सुरु झाले आहे. यात पहिल्यांदाच पूर्वीचे लिटिल चॅम्प्स रोहित राऊत, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड ज्युरी म्हणून सहभागी झालेत. या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने सांभाळली आहे.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्रपट आणि मालिकांमधील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मृण्मयी नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेतून समोर येत असते. आता ती सारेगमप लिटिल चॅम्प्सच्य माध्यमातून प्रेक्षकांना सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसत आहे.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
सारेगमप या कार्यक्रमाचं मी सूत्रसंचालन करावं हे माझ्या आईच स्वप्न होतं त्यामुळे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी मला विचारण्यात आलं तेव्हा मी लगेचच होकार दिल्याचं मृण्मयीने सांगितले.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
अलीकडेच या शोमध्ये 'जागर लोकसंगीताचा..' या भागासाठी मृण्मयीने हा खास ड्रेस परिधान केला होता.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
या ड्रेसवर तिने फोटोशूट केलं असून फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. त्यानंतर यावर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)
या ड्रेसवर मृण्मयी देशपांडेने नाकात नथ, गळ्यात नेकलेस या दागिन्यांनी तिच्या सौंदर्याला चारचाँद लावलेत.(photo courtesy : @mrunmayeedeshpande instagram)