कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री हिना खानचा ग्लॅम लूक; पाहा फोटो!
अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिना खान कॅन्सरचे उपचार घेत असून ती तब्येतीबाबतचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अनेक लोकांना तिच्या या खडतर प्रवासातून प्रेरणा मिळत आहे.
हिना खान हिने छोट्या पडद्यापासून सुरुवात करुन बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास केला आहे.
सध्या ती कॅन्सरवर उपचार घेत आहे.
काही महिन्यांपूर्वी हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं, तेव्हापासून हिना खान किमोथेरपीसह तिच्या सर्व उपचारांबाबतची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
हिनाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
ज्यात ती निळ्या रंगाच्या कफ्तान ड्रेसमध्ये दिसत आहे.हिना या ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
हिना खान ही टेलिव्हिजन शो ये रिश्ता क्या कहलातामध्ये अक्षराची भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. या शोमध्ये तिने सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारून घराघरात आपले नाव निर्माण केले.