Mangal Gochar 2025 : मंगळाचा मिथुन राशीत प्रवेश, 21 जानेवारीपासून 'या' राशींना सावधानतेचा इशारा; 72 दिवस राहावं लागेल अलर्ट
मंगळ ग्रहाच्या वक्री चालीचा 3 राशींवर फार वाईट परिणाम होणार आहे. या काळात तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया राशीच्या द्वितीय चरणात मंगळ ग्रहाचं संक्रमण होणार आहे. याचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. यासाठी तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. या काळात तुमच्या कुटुंबात अनेक समस्या वाढू शकतात. धनहानी होऊ शकते.
तसेच, तुमच्या कुटुंबात वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मंगळ ग्रहाच्या अशुभ परिणामापासून वाचण्यासाठी तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करावं. तसेच, मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तूंचं दान करावं.
मंगळ ग्रहाचं संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी फार घातक ठरणार आहे. या राशीच्या पंचम चरणात मंगळाचं संक्रमण होणार आहे. या काळात तुम्हाला मुलांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच, तुमच्या कुटुंबात मतभेद होऊ शकतात.
कुंभ राशीच्या लोकांना नोकरीतही सावधान राहण्याची गरज आहे. मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही लाल वस्त्र किंवा मिठाई दान करु शकता.
मीन राशीच्या लोकांसाठी देखील मंगळाचं संक्रमण अशुभ ठरणार आहे. मंगळाचं संक्रमण या राशीच्या चतुर्थ स्थानी आहे. याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. तुमच्यामधील वाद वाढू शकतात.
तसेच, या संक्रमणाचा तुमच्या प्रॉपर्टीवर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. या काळात मीन राशीच्या लोकांनी भगवान हनुमानाला शेंदूर चढवावा. यामुळे तुमच्या समस्या कमी होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)