Upcoming IPO: पैसै तयार ठेवा, लवकरच 6 आयपीओ लाँच होणार, सेबीनं दिला ग्रीन सिग्नल,गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Upcoming IPO: अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म कार्लाईलची हेक्सावेअर टेक्नोलॉजीज, इन्फ्रास्ट्रक्चर फर्म विक्रान इंजिनिअरिंग, पीएमईए सोलर टेक सोल्यूशन्स, अजाक्स इंजिनिअरिंग यांना आयपीओसाठी सेबीनं मान्यता दिली आहे. याशिवाय गुजरातच्या स्कोडा ट्यूब्स आणि ऑल टाइम प्लास्टिक्सनं आयपीओसाठी परवानगी घेतली आहे. या कंपन्या भांडवली बाजारातून 10 हजार कोटी रुपये उभारतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सर्व कंपन्यांची त्यांचे ड्राफ्ट पेपर्स सेबीकडे सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान जमा केले होते. 14-17 जानेवारी दरम्यान सेबीनं यांना ऑब्झरवेशन लेटर दिलं आहे. म्हणजेच त्यांना आयपीओ लाँच करण्यास परवानगी दिली आहे. हेक्सावेअर टेक्नोलॉजीजचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. कंपनी 9950 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेलद्वारे करेल.
विक्रान इंजीनियरिंग कंपनीचा आयपीओ 900 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअरची विक्री करणार आहे.कंपनीचे प्रमोटर्स 100 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहेत.
पीएमईए सोलर टेक सोल्यूशन्सचा आयपीओ 600 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला जाणार आहे. ऑफर फॉर सेल द्वारे 1.12 कोटींचे शेअर विकले जातील.
अजाक्स इंजिनिअरिंग लिमिटेडचा आयपीओ 2.28 कोटी इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी येईल. यामध्ये केदारा कॅपिटलचे 74.37 लाख शेअर आहेत.
ऑल टाइम प्लास्टिक्स या कंपनीचा आयपीओ 350 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी येईल. यामध्ये 52.5 लाख शेअरची विक्री ऑफर फॉर सेलद्वारे होईल. या आयपीओच्या माध्यमातून कैलैश शाह, भूपेश शाह आणि निलेश शाह प्रमोटर्सकडील प्रत्येकी 17.5 लाख शेअरची विक्री करतील. स्कोडा ट्यूब्स देखील इक्विटी शेअरच्या विक्रीसाठी 275 कोटींचा आयपीओ आणण्याची शक्यता आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)