कधीकाळी बड्या हिरोंसोबत काम, क्रिकेटरशी लग्न करताच करिअरला फुलस्टॉप, 2 मुलांची आई असलेली 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री कोण?

क्रिकेट आणि बॉलिवूडचं जवळचं नातं आहे. बॉलिवूडमध्ये मोठं नाव कमवलेल्या अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंशी लग्न केलेलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यात कधीकाळी बॉलिवूड गाजवलेली आणि अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केलेली गीता बसरा हिचादेखील समावेश आहे.

तिने क्रिकेटरला आपला जोडीदार म्हणून निवडल्यानंतर बॉलिवूडमधून रामराम घेत कुटुंब सांभाळण्याचा निर्णय घेतला.
गीता बसराने भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याच्याशी लग्न केलेलं आहे. या दोघांना आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
विशेष म्हणजे गीता आवडीने या दोन्ही मुलांना सांभाळते. कुटुंब सांभाळण्यासाठी तिने सिनेसृष्टी सोडून दिली.
गीता बसरा हिचा जन्म 13 मार्च 1984 रोजी इंग्लंडमध्ये झाला. ती अजूनही ब्रिटिश सिटिझन आह. गीता ही इंग्लंडमध्येच वाढली.
पुढे तिने किशोर नमित कपूर अॅक्टिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे धडे घेतले आणि मुंबईत राहून मॉडेलिंग चालू केली. पुढे तिने सिनेसृष्टीत जाण्याचाही निर्णय घेतला.
गीता बसराचा 2006 साली 'दिल दिया है' हा चित्रपट आला होता. या चित्रपटात इम्रान हाश्मी हा मुख्य अभिनेता होता. याच चित्रपटात अस्मित पटेल हादेखील अभिनेता होता.
दिल दिया है हा चित्रपट फ्लॉप ठरला. मात्र चित्रपटातील गाणे मात्र चांगलेच हिट ठरले.
त्यानंतर गीताचा 2007 साली द ट्रेन नावाचा चित्रपट आला. या चित्रपटातील गाणेदेखील चांगलेच हिट ठरले. या चित्रपटातही इम्रान हाश्मी मुख्य अभिनेता होता.
या दोन चित्रपटांशिवाय गीता बशराचे इतरही काही चित्रपट आले. मात्र पुढे 2015 साली तिचे लग्न झाले आणि बॉलिवूड सोडण्याचा तिने निर्णय घेतला.
गीता बसराने 29 ऑक्टोबर 2015 रोजी हरभजन सिंग याच्यासोबत लग्न केलं. एका गुरुद्वारामध्ये त्यांनी हे लग्न केलं आहे. या विवाहसोहळ्यात त्यांचे काही मित्रमंडळी आणि कुटुंबीय सामील झाले होते.
हरभजन सिंग आणि गीता बसरा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता गीता या दोन मुलांचा सांभाळ करते. गीता सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
आपल्या आयुष्यात नेमकं काय चालू आहे, याचे फोटो गीता बसरा इन्स्टाग्रामवर नेहमीच शेअर करते.
गीता बसरा भविष्यात बॉलिवूडमध्ये परतणार का? असे तिला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना मला एखादी चांगली कथा असणारा चित्रपट मिळाला तर मी त्यात नक्की काम करेन, असं तिनं म्हटलं होतं.
त्यामुळे गीता बसरा भविष्यात एखाद्या चित्रपटात दिसणार का? याची सर्वांनाचा उत्सुकता लागली आहे. सध्यातरी ती आई म्हणून दोन मुलांची काळजी घेत आहे.
गीता बसरा
गीता बसरा