नवऱ्याशिवाय होळी खेळताना दिसताच सोनाक्षी सिन्हा तुफान ट्रोल, मग तिनेही दिलं जशास तसं उत्तर; म्हणाली, कमेंटमध्ये थोडं..
सध्या संपूर्ण देशात धुलीवंदनाचा उत्साह आहे. देशभरात रंगांची उधळण होत आहे. बॉलिवूडचे सिनेस्टारही यावेळी मोठ्या जोमात रंग खेळत आहेत. विशेष म्हणजे यातील काही कलाकारांनी तर धुलीवंदनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी तर लग्नानंतरच्या पहिल्या धुलीवंदनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेदेखील लग्नानंतर आपल्या पहिल्या धुलीवंदनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोंची सगळीकडे चर्चा होत आहे.
काही लोकांनी तर तिला चक्क ट्रोल केलं आहे. तिने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिचा पती जहीर इक्बाल दिसत नसल्यामुळे पतीसोबत होळी साजरी का करत नाहीस, असे प्रश्न केले आहेत.
टोर्लर्सच्या या प्रश्नांना सोनाक्षी सिन्हाने जशास तसे उत्तर दिले आहे. सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतरची पहिली होळी पतीशिवाय साजरी केलेली आहे. तिने या सेलिब्रेशनचे अनेक फोटो इन्स्टाग्राम या समाजमाध्यम खात्यावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या कपड्यांत दिसत आहे.
या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या माथ्यावर लाल रंगाची टिकली दिसत आहे. तर तिच्या चेहऱ्यावर लाल आणि पिवळा रंग लागला आहे सोबतच तिच्या हातांवर गुलाबी रंग लागलेला दिसतोय.
विशेष म्हणजे या रंग खेळतानाचे फोटो काढताना तिने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. हेच फोटो पाहून टोलर्सने 'जहीर कुठे आहे?' असे म्हटले आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने 'पतिदेव कुठे आहेत?' असं विचारलंय.
तिसऱ्या एका ट्रोलरने तुमच्या पतीने यावेळी रंग खेळला नाही का, असा सवाल केलाय. ट्रोलर्सच्या या प्रश्नांना तिने जशास तसं उत्तर दिलंय. ' होळी आहे! रंगांची उधळण करा. आनंद साजरा करा. हॅपी होळी माझ्या मित्रांनो. मी सध्या जटाधारा चिपटाच्या शूटिंगमध्ये असून तेथूनच हे फोटो पोस्ट केले आहेत. जहीर इकबाल सध्या मुंबईत असून तो माझ्यासोबत नाहीये. असं म्हणत तिने ट्रोलर्सना उत्तर दिलंय.'