Nagpur News : नागपुरातील राम भंडार हॉटेलमध्ये भीषण आग; एसीचा सिलेंडर फुटल्याने हॉटेलचं मोठं नुकसान
नागपूरच्या प्रताप नगर इथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातील राम भंडार हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, एसीचा सिलेंडर फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
मात्र या आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात हॉटेलचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यभरात आज होळीचा दिवस साजरा होत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र होळी निमित्य घटनास्थळी गर्दी नसल्याने कुठलीही जीवित हानीची घटना सुदैवाने टळली आहे.
सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पुढील प्रक्रिया करत आहे.
मात्र या आगीच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.