PHOTO: दिया मिर्झाने शेअर केला ग्लॅम लूक; चाहते घायाळ!
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झानं (Dia Mirza) तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. (PC: diamirzaofficial/instagram )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदियाचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये झाला. दियाच्या आई दीपा या बंगाली हिंदू आहेत. तर तिचे वडील फ्रँक हेड्रिच जर्मन आहेत. (PC: diamirzaofficial/instagram )
ती चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दियाच्या आईने हैदराबादचे अहमद मिर्झा यांच्यासोबत लग्न केले. (PC: diamirzaofficial/instagram )
दियाने तिचे शिक्षण हैदराबादमध्ये केले आहे. कॉलेजमध्ये असताना तिनं काम करायला सुरुवात केली. ती एका मीडिया फर्ममध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह होती. (PC: diamirzaofficial/instagram )
यादरम्यान तिनं लिप्टन, वॉल्स आईस्क्रीम, इमामी आणि इतर कंपन्यांसह सर्व मोठ्या कंपन्यांकडून मॉडेलिंगची ऑफर मिळू लागली. (PC: diamirzaofficial/instagram )
दिया मिर्झाने 2000 साली फेमिना मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत ती सेकंड रनर अप ठरली (PC: diamirzaofficial/instagram )
दियाने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात तिने लाल रंगाची साडी नेसलीये.(PC: diamirzaofficial/instagram )
कानात मोठे झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.(PC: diamirzaofficial/instagram )
दियाने 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.(PC: diamirzaofficial/instagram )
नंतर 'दीवानापन', 'तुमको ना भूल पायेंगे', 'दम', 'परिणीता', 'लगे रहो मुन्नाभाई' आणि 'संजू' या हिट चित्रपटांमध्ये दियानं काम केलं. (PC: diamirzaofficial/instagram )