PHOTO : ब्युटी इन ब्लॅक, अभिनेत्री अनुष्का शर्माचं खास ‘बर्थडे’ फोटोशूट!
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आज म्हणजेच 1 मे रोजी अनुष्का तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया खास दिवसाचं निमित्त साधत अनुष्काने स्पेशल फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाच्या या आउटफिटमध्ये अनुष्का शर्मा खूप सुंदर दिसत आहे.
अनुष्काने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लेक वामिकाच्या जन्मानंतर ती चित्रपटांपासून दूर होती. पण, आता ती पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
कला शाखेची पदवी घेतल्यानंतर अनुष्काने अर्थशास्त्रात एमए केले आहे. अनुष्का शर्माच्या करिअरची पहिली पसंती पत्रकारिता होती. पण, संधी मिळाली आणि अनुष्काचं मनोरंजन विश्वात पदार्पण झालं.
दिवंगत फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिग्स यांनी अनुष्काला एका मॉलमध्ये काही समान खरेदी करताना पाहिलं. त्यांनी तिला मॉडेलिंग करण्याविषयी विचारलं, ज्यावर तिने लगेच होकारही दिला. इथूनच तिचे मॉडेलिंग करिअर सुरू झाले.
अनुष्का फिल्मी कुटुंबातील नसून, तिने स्वबळावर चित्रपटांमध्ये यश मिळवले. अनुष्काने हे यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. (PHOTO : @anushkasharma/IG)