Ram Charan: अभिनेता राम चरणचं 30 कोटींचे आलिशान घर पाहिलतं का?
नुकतंच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरण यानं हैद्राबादमध्ये अलिशान बंगला खरेदी केला आहे. हा बंगला राम चरण आणि त्याची त्याची पत्नी कामिनेनी कानिडेला या दोघांनी मिळून विकत घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराम चरणनं हा बंगला हैद्राबादच्या जुबली हिल्ससारख्या पॉश भागात खरेदी केला आहे. हा बंगला आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. या बंगला प्रसिद्ध डिझायनर तरूण तहलियानी यांनी डिझाईन केला आहे.
अलिकडेच ऑस्कर विजेत्या RRR सिनेमात राम चरण झळकला होता. त्यानं 25 हजार वर्ग फूट इतक्या जागेत बंगला बनवला असून राम आपल्या कुटुंबियासोबत इथं राहतो.
राम चरणच्या या नवीन बंगल्यात आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर मिलाफ साधण्यात आला आहे. या बंगल्यात व्यायाम शाळेसह इतर अनेक आत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
राम चरणचा हा बंगला हिरावाईनं नटलेला आहे. या बंगल्यात ऐसपैस आणि सुंदर गार्डन दिलेलं आहे. यासोबत बंगल्याची अंतर्गत रचना करताना हिरवळीची काळजी घेण्यात आली आहे.
अभिनेता राम चरण हिंदू परंपरेचं मनोभावे आचरण करतो. तो नेहमी हिंदू-देव देवतांच दर्शन घेण्यासाठी मंदिरात दिसतो. यामुळे त्यानं नवीन बंगल्यातही देवघर बनवलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम चरण आणि त्याची पत्नीनं हा बंगला हैद्राबादच्या सर्वात श्रीमंत परिसरात विकत घेतला आहे. त्यांनी तब्बल 30 कोटी रूपयांत बंगला विकत घेतला आहे.
राम चरणची एकूण संपत्ती 1 हजार 350 कोटी रूपये इतकी आहे. तर त्याची पत्नी कामिनेनी कानिडेला ही एक उद्योजक आहे. कामिनेनी जवळपास 1 हजार 200 कोटी रूपयांची मालकीन आहे.