Health Tips: सकाळी रिकाम्या पोटी पाण्यात लिंबू पिळून प्यावं; आरोग्यावर होतात 'हे' सकारात्मक परिणाम
रोज सकाळी कोमट लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिंबू रक्तदाब, नैराश्य आणि यकृतासाठी खूप चांगले आहे.
लिंबू पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते. मजबूत प्रतिकारशक्ती शरीराला अनेक विषाणूजन्य संसर्गापासून वाचवण्यास मदत करते.
लिंबू पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने त्वचा सुधारते. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. चमकदार त्वचेसाठी तुम्ही दररोज लिंबू पाण्याचे सेवन करू शकता.
लिंबू नैसर्गिक पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. त्यातील व्हिटॅमिन सी गुणधर्म फ्लू आणि सर्दीपासून संरक्षण करण्यास मदत करते. हे अनेक प्रकारचे व्हायरस आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासून शरीराचे संरक्षण करते.