Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडेचं मराठमोळं फोटोशूट; पाहा खास फोटो!
अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashwini Mahangade) ही आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस यायची.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती या मालिकेत अनघा ही व्यक्तिरेखा साकरत होती.
अश्विनी ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असते.
अश्विनीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अश्विनीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
अस्मिता, माधुरी मिडल क्लास कल्पतरू, लक्ष्य, ब्रह्मांडनायक, आणि सावर रे या मालिकांमध्ये देखील अश्विनीनं काम केलं.
अश्विनी (Ashwini Mahangade) ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 237K फॉलोवर्स आहेत. विविध लूकमधील फोटो अश्विनी सोशल मीडियावर शेअर करते.
नुकताच तिने एक नवा लूक शेअर केला आहे.
ज्यात तिने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली आहे.
नाकात नथ घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
अश्विनीने नऊवारी साडीतील लूकवर मोजके दागिने परिधान (Traditional Jewellery) केले आहेत.