Coffee : दिवसभरात नव्हे तर या खास वेळी कॉफी प्यायल्यास तुमचे हृदय निरोगी राहते, जाणून घेऊया!
कॉफीचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टींची नेहमीच चर्चा होत असली तरी एका संशोधनातून असे समोर आले आहे की, कॉफीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, मात्र ती पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांना हृदयविकाराने मरण्याचा धोका कमी असतो.
दिवसभर कॉफी पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत मृत्यूचा धोकाही कमी होतो.
यूएस मधील टुलेन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असे दाखवून दिले की जे लोक सकाळी कॉफी पितात त्यांचा मृत्यू कोणत्याही कारणाने होण्याची शक्यता 16 टक्के कमी असते आणि हृदयविकाराने मरण्याची शक्यता 31 टक्के कमी असते.
तथापि, कॉफी न पिणाऱ्यांच्या तुलनेत दिवसभर कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये धोका कमी झाला नाही.
अभ्यासात, संशोधकांनी 1999 ते 2018 दरम्यान 40,725 प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण केले. अभ्यासाचा एक भाग म्हणून, सहभागींना त्यांच्या दैनंदिन आहाराबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
विचारण्यात आले की, तुम्ही एका दिवसात किती कॉफी प्यायला आणि किती वाजता?
तथापि, सकाळी कॉफी पिल्याने हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका कसा कमी होतो हे अभ्यासात स्पष्ट झालेले नाही.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )